जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद थोडक्यात बचावला

वृत्तसंस्था
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालिदवर अज्ञात व्यक्तीने आज (सोमवार) गोळीबाराचा प्रयत्न केला असून, यामधून तो थोडक्यात बचावला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालिदवर अज्ञात व्यक्तीने आज (सोमवार) गोळीबाराचा प्रयत्न केला असून, यामधून तो थोडक्यात बचावला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मध्य दिल्लीमध्ये असलेल्या भारतीय संविधान क्लबबाहेर उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न झाला. 'निर्भय स्वातंत्र्य दिशेने' या विषयावरील एका चर्चासत्राला उमर उपस्थित होता. अज्ञात व्यक्तीने खालिदच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने खालिदला गोळी लागली नाही. उमर खालिदवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याचप्रमाणे या जीवघेण्या हल्ल्यामागील कारणही अस्पष्ट आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, परिसर ताब्यात घेण्यात आला आहे.

उमर खालिद हा डीएसयू अर्थात डेमोक्रेटिक स्टूटंड युनियनचा नेता आहे. डीएसयूला भाकपची (माओवादी) विद्यार्थी संघटना मानले जाते. जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठात ही युनिअन कार्यरत आहे. युनियनकडे बौद्धिक पातळीवर धुरा सांभाळण्याचं काम आहे.

संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी अफझल गुरुला फाशी ठोठावल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी 9 फेब्रुवारी 2016 रोजी उमर खालिदसह काही विद्यार्थ्यांनी जेएनयूमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता, असा जबाब कन्हैया कुमारने दिला होता. याप्रकरणी उमरला निलंबित करण्यात आले होते.

Web Title: JNU student leader Umar Khalid attacked in Delhi