esakal | बंगालमध्ये जेपी नड्डा यांच्यावर हल्ल्याची योजना ? भाजपने गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

jp nadda main.jpg

भाजप कार्यालयाच्या बाहेर सुमारे 200 लोकांनी गर्दी केली होती. त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या दिसल्या. त्यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना काळे झेंडेही दाखवले. 

बंगालमध्ये जेपी नड्डा यांच्यावर हल्ल्याची योजना ? भाजपने गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले पत्र

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

कोलकाता- यंदा पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका वादळी ठरण्याची शक्यता आहे. भाजपने कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये बाजी मारायचीच असे ठरवल्याचे दिसते. गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये सातत्याने संघर्ष होताना दिसत आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे बुधवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर कोलकोत्यात पोहोचले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. तर, दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी जेपी नड्डा यांना भाजपच्या नव्या निवडणूक कार्यालयाबाहेर काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान भाजपने टीएमसीवर गंभीर आरोप करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. 

पश्चिम बंगाल भाजपने अमित शहा यांना पत्र लिहिले असून त्यात जेपी नड्डा यांच्यावर हल्ल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. चिठ्ठीत म्हटले आहे की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी कोलकाताला आले आहेत. परंतु, त्यांच्या सुरक्षेबाबत बंगाल पोलिसांची भूमिका योग्य नाही. पोलिस हलगर्जीपणा करत आहेत. हेस्टिंग्जमध्ये भाजप कार्यालयाच्या बाहेर सुमारे 200 लोकांनी गर्दी केली होती. त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या दिसल्या. त्यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना काळे झेंडेही दाखवले. 

हेही वाचा- गावपातळीवर ‘वाय-फाय’पोचविणार;एक कोटी डेटा सेंटर सुरू करणार

पोलिसांनी या जमावाला रोखण्याचा प्रयत्नच केला नसल्याचा बंगाल भाजपने आरोप केला. त्या जमावाला नड्डा यांच्या वाहनाकडे येऊ दिले. त्याचबरोबर बंगाल पोलिसांकडून देण्यात आलेली पायलट कारने सोपा मार्ग निवडला नाही. नड्डा यांचे वाहन अनेक ठिकाणी सिग्नलला थांबवण्यात आले. 

पत्रात म्हटले आहे की, पश्चिम बंगाल पोलिस आणि सरकारने झेड श्रेणी सुरक्षा असलेले जेपी नड्डा यांच्या सुरक्षेत ढिलाई केल्याचा आरोप केला. त्याचबरोबर त्यांच्या आजच्या कार्यक्रमासाठीच्या सुरक्षेसाठी चिंता जाहीर केली आहे. नड्डा जेव्हा हेस्टिंग्ज परिसरातील पक्षाच्या निवडणूक कार्यालयात आले. त्यावेळी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. नड्डा जेव्हा कार्यालयात प्रवेश करत होते. त्यावेळी ''भाजपा वापस जाओ'' अशा घोषणा देण्यात येत होत्या. 
 

loading image