
नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) कार्यकाळ अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत वाढवला जाणार आहे. ‘जेपीसी’चा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपुष्टात येत असून मसुदा अहवालावर विरोधी पक्षांच्या खासदारांनी घेतलेल्या आक्षेपानंतर कार्यकाळ वाढीसाठी मंजुरी घेणारा प्रस्ताव उद्या (ता. २८) ‘जेपीसी’चे अध्यक्ष जगदंबिकापाल व खासदार दिलीप सैकीया मांडतील, असे सूत्रांनी सांगितले.