

JPSC-JSSC Paperleak
esakal
झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित घोटाळ्याच्या तपासाला सीआयडीने वेग दिला आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी गुरुवारी विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. दरम्यान, जेपीएससी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम मिळालेल्या ICN संस्थेचे संचालक मिथलेश सिंह यांना दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे. अटक आरोपींच्या चौकशीतून तपास यंत्रणेला महत्त्वाची माहिती मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.