
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या तपास समितीने उच्च न्यायालयातील न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावर गैरवर्तणुकीचा ठपका ठेवताना त्यांच्या हकालपट्टीची शिफारस केली आहे. ज्या स्टोअररूममध्ये नोटा जळालेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्या होत्या त्यावर वर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांचे पूर्ण नियंत्रण होते. या कृत्यामधून वर्मा यांची गैरवर्तणूकच दिसून येते, त्यांचे हे कृत्य हकालपट्टी करण्यासाठी पुरेसे असल्याचे या समितीने म्हटले आहे.