
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अतुल चांदूरकर तसेच अन्य दोन न्यायाधीशांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने केंद्र सरकारकडे केली आहे. शिफारस करण्यात आलेल्या दोन न्यायाधीशांमध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विजय बिष्णोई आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. व्ही. अंजारिया यांचा समावेश आहे.