
भोपाळ : मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मावळते न्यायाधीश दुप्पाला व्यंकट रमणा यांनी आज निरोप समारंभामध्ये बोलताना थेट सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमवरती कठोर शब्दांत ताशेरे ओढले. केवळ छळ करण्याच्या उद्देशानेच आपली बदली करण्यात आली होती. याचा मोठा फटका आपल्या कुटुंबाला बसला, त्यांनाही याचा फार त्रास सहन करावा लागल्याचे ते म्हणाले. कॉलेजियमच्या आदेशामुळे रमणा यांची २०२३ मध्ये आंध्रप्रदेश उच्च न्यायालयातून मध्यप्रदेशात बदली झाली होती. रमणा यांनी बदली रद्द करण्यात यावी म्हणून कॉलेजियमकडे विनंती केली होती पण त्यांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.