मी शेतकरी पुत्र, घाबरत नाही; बदलीच्या धमकीनंतर न्यायाधीशांचं प्रत्युत्तर

मी शेतकरी पुत्र, घाबरत नाही; बदलीच्या धमकीनंतर न्यायाधीशांचं प्रत्युत्तर
Updated on

बंगळुरू - मागील दोन ते तीन दिवसांपासून न्यायालयाच्या न्यायाधीशांना धमकी मिळत सत्र सुरू झाले आहे. नुपूर शर्मा प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या मिळाल्याचं प्रकरण ताजे असतानाच कर्नटाकमधून देखील न्यायमूर्तींना धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एचपी संदेश यांनी सोमवारी सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) विरोधात केलेल्या टिप्पणीनंतर आपल्याला बदलीची धमकी देण्यात आली होती. (justice hp sandesh alleges for hreatened)

मी शेतकरी पुत्र, घाबरत नाही; बदलीच्या धमकीनंतर न्यायाधीशांचं प्रत्युत्तर
'सरल वास्तू'चे चंद्रशेखर गुरू यांची हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद

न्यायमूर्तींनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाबाबत टिप्पणी करताना म्हटलं होतं की, ACB हे 'कलेक्शन सेंटर' झाले आहे. धमकी मिळाल्यानंतर न्यायाधीश संदेश म्हणाले की, आपण अशा धमक्यांना घाबरत नाही. न्यायमूर्ती संदेश यांनी गेल्या आठवड्यात एसीबीच्या कामकाजाविरोधात बेंगळुरू शहरातील उपायुक्त कार्यालयातील उप-तहसीलदार पीएस महेश यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना ही टिप्पणी केली होती.

जमिनीच्या वादात आदेशाच्या मोबदल्यात पाच लाख रुपयांची लाच घेताना कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यावेळी न्यायालयाने वरिष्ठ अधिकार्‍यांना वाचवलं जातं आणि कनिष्ठ कर्मचार्‍यांवरच कारवाई केली होते असं निरीक्षण नोंदवलं होतं. त्यानंतर याच प्रकरणी आयएएस अधिकारी आणि बंगळुरू शहराचे माजी उपायुक्त मंजुनाथ जे. यांना सोमवारी एसीबीने अटक केली आहे.

मी शेतकरी पुत्र, घाबरत नाही; बदलीच्या धमकीनंतर न्यायाधीशांचं प्रत्युत्तर
कॅब चालकाने केली हत्या; OTP सांगण्यापूर्वीच मुले कारमध्ये बसल्याचा राग

न्यायमूर्ती संदेश म्हणाले होते की, एसीबी एक "कलेक्शन सेंटर" बनले आहे आणि एसीबीचे एडीजीपी हे कलंकित अधिकारी आहेत. 29 जून रोजी न्यायालयाने एसीबीला 2016 पासून आतापर्यंत ज्या प्रकरणांमध्ये एसीबीने 'बी' अहवाल दाखल केला त्या सर्व प्रकरणांचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले होते.

सोमवारी जेव्हा हे प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी आले तेव्हा न्यायमूर्ती संदेश म्हणाले, "मी लोकांच्या भल्यासाठी तयार आहे. तुमचे एसीबी एडीजीपी सीमांत कुमार सिंग शक्तिशाली व्यक्ती वाटतात. कोणीतरी माझ्या सहकाऱ्याला हे सांगितले आहे. तसेच आपल्याला मिळालेली बदलीची धमकी ऑर्डरमध्ये नोंदवली जाईल.

दरम्यान 'मी कोणाला घाबरत नाही. मांजरीच्या गळ्यात घंटा बांधण्यासाठी आपण तयार आहोत. न्यायाधीश झाल्यानंतर मी मालमत्ता जमवली नाही. पद गेलं तरी आपल्याला फरक पडत नाही. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी शेती करायला तयार आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून कोणतीही राजकीय विचारधारा मानत नसल्याचं न्यायमूर्ती संदेश यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com