तिरुअनंतपूरम : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत शर्मा यांच्या निवासस्थानी जळालेल्या अवस्थेतील नोटा सापडल्याप्रकरणी त्यांच्यावर लोकप्रतिनिधींकडून महाभियोग आणला जात आहे..लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही या असामान्य कृतीला संमती दिली आहे. या घटनेमुळे इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. सुमारे १९० वर्षांपूर्वी केरळमधील तत्कालीनच त्रावणकोर संस्थानच्या राजानेही भ्रष्ट न्यायाधीशांविरुद्ध कठोर कारवाई केली होती..यावर्षी मार्च महिन्यात न्यायाधीश शर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील नोटा सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांना पदावरून हटविण्यासाठी महाभियोगाची प्रक्रिया सुरू आहे. तत्कालीनच त्रावणकोर संस्थानचे दूरदृष्टीचे राजे स्वाती थिरूनालने १९० वर्षांपूर्वी भ्रष्ट न्यायाधीशांना सुरुवातीला घरातच नजरकैदेत ठेवून नंतर अटक करण्याचे आदेश दिले होते..राजे थिरूनाल यांनी आपल्या प्रजेला अपील न्यायालयातील न्यायाधीश कुंचू पंडालाई यांना पकडून अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याचे आवाहन केले होते. खून प्रकरणात चुकीचा निकाल दिल्यानंतर न्यायाधीश पंडालाई फरार झाले होते. एका खून प्रकरणात १८३५ मध्ये सत्य व न्यायाच्या विरोधात निकाल दिल्यामुळे या न्यायाधीशांवर कारवाई करण्यात आली होती. राजे थिरूनाल यांचा दिवाण सुब्बा राव यांनी या निकालाची घोषणा केली होती..या कारवाईचा ऐतिहासिक आदेश केरळ सरकारच्या अभिलेख कक्षाने २००५ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘निवडक शासन निर्णय’ या ग्रंथातही समाविष्ट करण्यात आला आहे. न्यायाधीश पंडालाई यांना पकडून अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याचे आवाहन जनतेला करण्यात येत आहे. सत्य व न्यायाच्या विरोधात निकाल दिल्यानंतर ते फरार झाले, असा उल्लेखही ग्रंथात आहे..Premium| Bangladesh Politics: बांगलादेशात राजकीय अस्थिरतेत वाढ का? त्याचे भारतावर काय परिणाम होतील?.न्यायाधीश पंडालाई हे त्रावणकोरचा भाग असलेल्या अलापुझात न्यायाधीश होते. मात्र, त्यांनी खून प्रकरणात पक्षपाती निकाल दिला होता. त्यानंतर राजे थिरूनाल यांनी हा आदेश दिला होता. राजांच्या वतीने या आदेशाची घोषणा करताना दिवाण सुब्बा राव यांनी न्यायाधीशांच्या ठावठिकाण्याबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांना पकडून तहसीलदार किंवा अन्य अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्यावे, असेही जाहीर केले होते. मात्र, हे फरार न्यायाधीश अखेर सापडले का आणि त्यांना कोणती शिक्षा करण्यात आली, याबाबतचे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ सापडत नाहीत..त्रावणकोरचे राजघराणे नियम व कायद्यांचे कठोर पालन करणारे म्हणून ओळखले जात होते. त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर उपाययोजना केल्या. सध्या तमिळनाडूत असलेल्या व तत्कालीन त्रावणकोर संस्थानचा भाग असलेल्या नागरकोयलच्या न्यायाधीशाने आरोपींना विशिष्ट धर्मातील असल्याने पक्षपात केल्याच्या आरोपानंतरही त्यांची तत्काळ बदली करण्यात आली होती.- टी. पी. शंकरनकुट्टी नायर, इतिहासतज्ज्ञ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.