
Jyoti Malhotra Youtuber: हरियाणाच्या हिसार येथील प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली 17 मे 2025 रोजी अटक करण्यात आली. तिच्यावर भारतीय दंड संहिता (BNS) कलम 152 आणि ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट 1923 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ज्योती तिच्या ‘ट्रॅव्हल विथ जो’ या यूट्यूब चॅनेलद्वारे लोकप्रिय आहे, जिथे तिचे 3.77 लाख सब्सक्रायबर्स आहेत. तिच्या पाकिस्तानमधील प्रवासाचे व्हिडीओ आणि सोशल मीडियावरील गतिविधींमुळे सुरक्षा यंत्रणांचे तिच्यावर लक्ष होते.