jyotsna bose
jyotsna bosee sakal

कोरोना संशोधनासाठी देहदान करणाऱ्या पहिल्या महिला 'जोत्सना बोस' होत्या तरी कोण?

नवी दिल्ली : जगात कोरोनाने (corona pandemic) थैमान घातले आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे अनेकांचा जीव गेला. कोणाचं अख्खं कुटुंब उद्धवस्त झालंय. मात्र, कोरोनावर अजूनही ठोस अशी उपचार पद्धती सापडली नाही. लक्षणानुसार औषधं देऊन कोरोना रुग्णांना बरं करण्यात येत आहे. यासाठी कोरोना मानवाच्या शरीरावर कशाप्रकारे प्रभाव करतो? हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी कोलकाता येथील ९३ वर्षीय जोत्सना बोस (jyotsna bose) यांनी आपला देहदान (donated body for covid research) केला आहे. कोरोनासाठी देहदान करणाऱ्या त्या पहिल्याच महिला (first lady to donate body for corona) ठरल्या आहेत. पश्चिम बंगालमधील एनजीओ गणदर्पणने याबाबत माहिती दिली. मात्र, इतकं मोठं दान करणाऱ्या जोत्सना बोस नेमक्या कोण होत्या? याबाबत जाणून घेऊया. (jyotsna bose is the first lady to donated her body for corona research)

jyotsna bose
18-44 वयाच्या लोकांना ऑनलाईन अपॉइंटमेंटशिवाय मिळणार लस

कोण होत्या जोत्सना बोस?

ज्योत्सना बोस यांचा जन्म १९२७ साली चिटगांव येथे झाला होता. सध्या चिटगांव हे बांग्लादेशमध्ये आहे. जोत्सना यांच्या घरची आर्थिक परिस्थिती फारच हलाखीची होती. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. परिस्थितीमुळे त्यांनी ब्रिटीश टेलिफोनवर ऑपरेटर म्हणून काम केले. तेव्हापासूनच ट्रेड युनियनच्या लीडर म्हणून त्यांची कारकिर्द सुरू झाली. गेल्या १९४६ मध्ये ऑल इंडिया पोस्ट आणि टेलिग्राफच्या गाजलेल्या आंदोलनात देखील त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी कामगार चळवळीचे कट्टर नेते मोनी गोपाल बासुशी लग्न केले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्यात स्वतःला झोकून दिले होते.

10 वर्षांपूर्वीच देहदानाचा निर्णय -

जोत्सना बोस यांची नात, डॉ. तिस्ता बसु यांनी सांगितले, की जोत्सना यांना उत्तर कोलकाता येथील बेलियाघाट परिसरातील एका रुग्णालयात १४ मे रोजी दाखल करण्यात आले होते. याचठिकाणी जोत्सना यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या आजीने १० वर्षांपूर्वी एका संस्थेला आपला देह दान करण्याची शपथ घेतली होती. त्यामुळे त्यांचा देह कोरोना संशोधनासाठी दान करत असल्याचे डॉ. तिस्ता बसु यांनी सांगितले

बोस यांच्यापूर्वीही एकाने केले देहदान -

कोरोना संशोधनासाठी देहदान करणाऱ्या बोस या पश्चिम बंगालमधील दुसऱ्या व्यक्ती आहेत. यापूर्वी देखील पश्चिम बंगालमधीलच ब्रोजो रॉय यांनी आपले शरीर कोरोना संशोधनासाठी दान केले होते. कोरोनानं मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या शरीराचे एका सरकारी रुग्णालयातील पॅथॉलॉजीमध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आले होते.

जोत्सना बोस यांच्यानंतरही एकाने केले देहदान -

जोत्सना बोस यांनी कोरोना संशोधनासाठी देहदान केल्यानंतर त्यांच्यापासून आणखी एक व्यक्ती प्रेरीत झाली. कोरोना महामारीची लागण झालेल्या नेत्ररोग विशेषतज्ज्ञ डॉ. विश्वाजीत चक्रवर्ती यांनी देखील कोरोना संशोधनसाठी आपलं शरीर दान केले आहे. शरीर दान करणारे ते पश्चिम बंगालमधील तिसरे व्यक्ती आहेत.

संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असताना कोरोना मानवी शरीराला नेमका कसा प्रभावित करतो? याबाबत संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी जोत्सना बोस यांनी केलेले देहदान हे फार महत्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com