
कुतुब मीनारजवळील मशीद २७ मंदिर पाडून बांधली; पुरातत्वतशास्त्रज्ञाचा दावा
नवी दिल्ली : दिल्लीतील कुतुब मीनारजवळील (Qutub Minar) कुव्वत-उल-इस्लाम मशीद ही २७ मंदिरे पाडून बांधण्यात आली होती. कुतुब मीनारजवळ अनेक मंदिरांचे अवशेष सापडले आहेत. ज्यामध्ये जवळच गणेश मंदिर आहे. यावरून सिद्ध होते की, तेथे गणेश मंदिरे होती, असा दावा राम मंदिराच्या इतिहासाचे पुरावे शोधणारे इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद (K. K. Mohammed) यांनी केला आहे. शासन नियमानुसार त्यांच्या स्थापनेची तयारी करीत आहे. (Temples were demolished and a mosque was built near the Qutub Minar)
कुतुब मीनारजवळ (Qutub Minar) भगवान गणेश यांच्या एक नाही तर अनेक मूर्ती आहेत. ही जागा पृथ्वीराज चौहान यांची राजधानी होती. कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यासाठी तेथील सुमारे २७ मंदिरे पूर्णपणे नष्ट करण्यात आली. मंदिरे पाडल्यानंतर निघालेल्या दगडांपासून कुव्वत-उल-इस्लाम मशीद बनवण्यात आली होती.
एवढेच नाही तर त्या ठिकाणी अरबी भाषेत लिहिलेल्या शिलालेखांमध्येही याचा उल्लेख आढळतो. यामध्ये २७ मंदिरे पाडून मशीद बांधल्याचे लिहिले आहे. हे ऐतिहासिक सत्य आहे, असेही के. के. मोहम्मद म्हणाले. कुतुब मीनार केवळ भारतातच बांधला गेला नाही तर त्याआधी तो समरकंद आणि गुफारामध्येही बांधला गेला होता, असेही के. के. मोहम्मद (K. K. Mohammed) म्हणाले.
मोहम्मद यांच्या संशोधनाने बजावली महत्त्वाची भूमिका
के. के. मोहम्मद (K. K. Mohammed) हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी प्रादेशिक संचालक राहिले आहेत. बाबरी मशिदीच्या खाली मंदिराचे अवशेष असल्याचे त्यांनी प्रथम शोधून काढले होते. त्यांचे संशोधन १९९० मध्ये प्रथम प्रकाशित झाले. अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात के. के. मोहम्मद (K. K. Mohammed) यांच्या संशोधनाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे संशोधन हा या निर्णयामागे मोठा आधार ठरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Web Title: K K Mohammed Temples Were Demolished And A Mosque Was Built Near The Qutub Minar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..