Kadur Congess Leader Ganesh Gowda Killed
esakal
बंगळूर : चिक्कमगळूर जिल्ह्यातील कडूर तालुक्यातील साखरपट्टण येथील कलमुरुडेश्वर मठाजवळ दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्य गणेश गौडा (वय ३८) यांची शनिवारी निर्घृण हत्या झाली. आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत साखरपट्टण मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी (Congress Leader) ते इच्छुक होते.