esakal | माझा इन्काऊंटर न केल्याबद्दल धन्यवाद; डॉ. काफील खान यांची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

kafeel khan and yogi aadityanath.jpg

राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत National Security Act (NSA) नागरिकत्व कायद्याविरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असणारे डॉ. काफील खान यांची मथुरा तुरुंगातून बुधवारी रात्री सुटका करण्यात आली.

माझा इन्काऊंटर न केल्याबद्दल धन्यवाद; डॉ. काफील खान यांची प्रतिक्रिया

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

लखनऊ- राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत National Security Act (NSA) नागरिकत्व कायद्याविरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असणारे डॉ. काफील खान यांची मथुरा तुरुंगातून बुधवारी रात्री सुटका करण्यात आली. अलाहाबाद उच्च न्यायायलायने मंगळवारी त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश योगी सरकारला दिले होते. डॉक्टरांनी दिलेले भाषण कोणत्याही पद्धतीने हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचं वाटत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.

ट्रम्प यांना ट्विटरचा दणका; कॉपी-पेस्ट आणि खोट्या माहितीमुळे हटवल्या पोस्ट

तुरुंगातून सुटल्यानंतर उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवक्ते काफील खान यांनी प्रतिक्रिया दिली. न्यायपालिकेने योग्य आदेश दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. न्यायालयाने हे स्पष्ट केलं की मी कोणतेही चिथावणीखोर भाषण केले नाही. माझा इन्काऊंटर न केल्याबद्दल मी स्पेशल टास्क फोर्सचेही धन्यवाद मानतो. त्यांनी मला मुंबई ते मथुरा आणताना मारुन टाकलं नाही, त्याबद्दल त्यांचे आभार, असा टोमणा काफील खान यांनी मारला आहे.

काफील खान यांची योगी सरकारने बुधवारी तुरुंगातून सुटका केल्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राजाने राजधर्म पाळावा लागतो पण येथे राज्य सरकार बालहट्ट करते आहे, भविष्यामध्ये सरकार आपल्याला आणखी एखाद्या वेगळ्या प्रकरणामध्ये अडकवू शकते, असा टोमणा त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला आहे. आता तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर काफील खान यांनी बिहार आणि आसाममधील पूरग्रस्तांना मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. 

खान यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) राज्य सरकारने त्यांना मथुरेतील तुरुंगामध्ये डांबून ठेवले होते. सरकारने त्यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याचा ठपका ठेवला होता. अलिगड मुस्लिम विद्यापीठातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने काफील खान यांच्या सुटकेचे स्वागत केले आहे.

देशाच्या जीडीपीत ऐतिहासिक घट; इतर प्रमुख राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती...

गोरखपूर येथील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ६० बाळांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी खान यांना निलंबित आणि नंतर अटक करण्यात आली होती. 
डॉक्टर काफील यांच्यावरील कारवाईचा अनेक संघटना आणि IMA ने सुद्धा निषेध केला होता. काफील यांना विनाकारण या प्रकरणात गोवलं जात असून बळीचा बकरा केलं जात असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, 9 महिने तुरुंगात राहिल्यानंतर एप्रिल 2018 मध्ये काफील यांना जामिन मिळाला होता.

गेल्या वर्षी डिसेंबर 2019 मध्ये CAA विरोधात आंदोलनावेळी अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसमोर काफील यांनी भाषण केलं होतं. यात त्यांनी भावना भडकावणारी वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश एटीएसने त्यांना 29 जानेवारीला मुंबईतून अटक केली होती. तेव्हापासून काफील मथुरा इथल्या तुरुंगात होते.