'कहो ना प्याझ है!' अमूलच्या या कार्टूनवर तुम्हाला काय पंचलाईन सुचतीये? 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

या कार्टूनमध्ये 'अमूलगर्ल' तीन कांदे घेऊन खेळताना दिसत आहे आणि या कार्टूनला त्यांनी 'कहो ना प्याझ है' असे कॅप्शन दिले आहे. तर खाली कोपऱ्यात अमूल तुम्हाला कधीच रडविणार नाही असे द्यायलाही ते विसरले नाहीत. 

मुंबई : महाराष्ट्रात कांद्याच्या वाढत्या किमतींमुळे सामन्य नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे. शंभर ते दिडशे रुपये प्रति किलो असा भाव असलेल्या कांद्याने सामन्य नागरिकांचे हाल केले आहेत. अनेक खानावळी आणि हॉटेलमधून कांदा हद्दपार झाला आहे. कांद्यामुळे फक्त लोकांचेच हसू झालेले नाही तर हळूच चिमटा काढत हसविणारे कांद्यावरील मिम्ससुद्धा प्रचंड व्हायरल होत आहेत. अमूल नेहमीच त्यांच्या क्रिएटिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहे आणि आता त्यांनी कांद्यावर केले असेच भन्नाट कार्टून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या कार्टूनमध्ये 'अमूलगर्ल' तीन कांदे घेऊन खेळताना दिसत आहे आणि या कार्टूनला त्यांनी 'कहो ना प्याझ है' असे कॅप्शन दिले आहे. तर खाली कोपऱ्यात अमूल तुम्हाला कधीच रडविणार नाही असे द्यायलाही ते विसरले नाहीत. 

त्यांच्या 'कहो ना प्याझ है' या कॅप्शनवर लोकांच्या खूप प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेक लोकांनी या भावनेशी रिलेट करुन त्याला पर्यायी कॅप्शन सुचविले आहे तर अनेकांनी अमूलचे तोंडभरुन कौतुक केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kaho Na Pyaaz Hai Amuls Cartoon On Onion Prices gets Viral on Internet