कर्नाटक पोलिसांची ओपन फायरिंग; दहशत माजवणाऱ्याला घातली गोळी: Kalaburagi Police shoots | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kalaburagi Police shoots

Kalaburagi Police shoots: कर्नाटक पोलिसांची ओपन फायरिंग; दहशत माजवणाऱ्याला घातली गोळी

कर्नाटकातील कलबुर्गी येथे पोलिसांनी दहशत माजवणाऱ्यावर ओपन फायरिंग केलं आहे. गोळीबार करून त्याला जखमी केले. फजल भगवान असं त्याचं नाव आहे. (Kalaburagi Police shoots at man threatening to attack public with knives video viral )

फजल भगवान हा धारदार शस्त्राने लोकांना हल्ला करण्याची धमकी उघडपणे देत होता. ही घडना रविवारी सायंकाळी घडली. केवळ लोकांवरच नाही तर फजल भगवान याने पोलिसांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. जखमी फजलला प्रथम रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर अटक करण्यात आली आहे.

स्वतःच्या सुरक्षतेसाठी गोळीबार

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आरोपी फजल सुपरमार्केटजवळ हातात चाकू घेऊन लोकांना हल्ला करण्याची धमकी देत होता. यासंदर्भात लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्याला थांबवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ आणि लोकांच्या सुरक्षेसाठी फजलवर गोळीबार केला. गोळी लागल्याने फजल खाली पडला, त्यानंतर पोलिसांनी त्याला लाठीमार केला.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या हल्ल्यामागील हेतू स्पष्ट झालेला नाही. आम्हाला कंट्रोल रूममधून फोन आला आम्हाला माहिती मिळाली की एक व्यक्ती सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :Karnataka