
उत्तरकाशी : उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमध्ये प्राचीन ‘कल्पकेदार’ मंदिराचे मोठे नुकसान झाले असून, ते मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. काही दशकांपूर्वी उत्खननामध्ये ते जमिनीवर आले होते. मंगळवारच्या घटनेनंतर आता पुन्हा ते जमिनीखाली गेले आहे. या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असे, असे स्थानिकांनी सांगितले.