'कमल हसन फक्त चित्रपटात मुख्यमंत्री बनू शकतात वास्तवात नाही’

वृत्तसंस्था
रविवार, 18 ऑगस्ट 2019

अभिनेते कमल हसन यांनी राजकारणात पदार्पण केले. त्यांनी 'मक्कल सुधी मैयम' (एमएनएम) या पक्षांची स्थापना केली.

चेन्नई : कमल हसन हे फक्त चित्रपटांमध्ये मुख्यमंत्री होऊ शकतात, वास्तविक जीवनात नाही, अशा शब्दांत तमिळनाडूचे सहकारमंत्री सेलूर के. राजू यांनी टीका केली. तसेच कमल हसन एक चांगले अभिनेते आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या मागील निकालांनी हे सिद्ध केले आहे, की जनता त्यांना स्वीकारण्यास तयार नाही, असेही ते म्हणाले.

अभिनेते कमल हसन यांनी राजकारणात पदार्पण केले. त्यांनी 'मक्कल सुधी मैयम' (एमएनएम) या पक्षांची स्थापना केली. त्यानंतर आता त्यांच्यावर मंत्री राजू यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, कमल हसन एक चांगले अभिनेते आहेत. पण लोकसभा निवडणुकीच्या मागील निकालांनी हे सिद्ध केले आहे की जनता त्यांना स्वीकारण्यास तयार नाही. अण्णा द्रमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन हे एकमेव नेते होते, ज्यास तामिळनाडूच्या लोकांनी स्वीकारले.

दरम्यान, राजकारणात पदार्पण केल्यानंतर कमल हसन म्हणाले होते, आपण चित्रपटात काम करणार नाही. मात्र, तो वचन पाळण्यात अयशस्वी झाले. आता तो चित्रपट तसेच टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम करत आहे. एमजीआर हा एकमेव अभिनेता आहे ज्याने तमिळ लोकांची मनः  जिंकली. कमल लोकांची मने जिंकू शकले नाहीत आणि ते केवळ चित्रपटांमध्ये मुख्यमंत्रिपदी होऊ शकतात, ”असे राजू म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kamal Hassan can only become the CM in reel life not in real life