esakal | 'होय, मी कुत्रा आहे'; कमलनाथ यांच्या वक्तव्यावर ज्योतिरादित्य भडकले
sakal

बोलून बातमी शोधा

jyotiraditya shinde

मध्य प्रदेशमध्ये 28 विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत

'होय, मी कुत्रा आहे'; कमलनाथ यांच्या वक्तव्यावर ज्योतिरादित्य भडकले

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये 28 विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत. प्रचारादरम्यान नेत्यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. शनिवारी भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कुत्रा म्हणल्याच्या आरोपावर जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 

कमलनाथ म्हणतात मी कुत्रा आहे. होय, मी कुत्रा आहे. माझी मालक जनता आहे आणि मी त्यांची सेवा करतो. हो, कमलनाथ जी मी कुत्रा आहे, कारण कुत्रा आपला मालक आणि आपल्या दात्याची सेवा आणि सुरक्षा करतो. होय, मी कुत्रा आहे, कारण कोणी जर माझ्या मालकाकडे बोट दाखवेल आणि मालकासोबत भ्रष्टाचार आणि अयोग्य निती वापरेल तर कुत्रा नक्कीच चावणार, असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी पलटवार केला आहे. 

कमलनाथ यांनी एका निवडणूक प्रचारादरम्यान शिवराज सिंग चौहान सरकारमधील एका महिला विकास मंत्र्याला 'आयटम' म्हटले होते. तेव्हापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर कारवाई करत त्यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेतला आहे. कमलनाथ यांनी निवडणुक आयोगाच्या या कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक प्रचाराला दोन दिवस शिल्लक राहिले असताना निवडणूक आयोगाने कारवाई का केली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.