Kaneri Math Kadsiddheshwar Swami
esakal
अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी ढोंगी संन्याशांवर कठोर टीका केली.
बसव संस्कृती मोहिमेवरून सनातन धर्मावर आघात होत असल्याचा आरोप.
जनतेने धर्मविरोधी प्रवृत्तीविरुद्ध थेट कारवाई करावी, असे केले आवाहन
अथणी : राज्यभर काही ढोंगी संन्याशांचा गट फिरत आहे. त्यांच्याकडून मंदिरात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, अशा प्रकारचा प्रचार करत आहेत. संन्यास धर्म आणि देशासाठी हे घातक ठरत आहे. अशा संन्याशांना खांबाला बांधून चोप द्यायला पाहिजे, असे मत कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी (Kaneri Math Kadsiddheshwar Swami) यांनी व्यक्त केले.