कंगना थांबेना! दिवसभरात नेमकं काय काय घडलं!

kangana
kangana

 मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत तिने आपल्या कार्यलयावर झालेल्या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केलाय. कंगना  हिमाचल प्रदेशवरुन मुंबईला रवाना होण्यापूर्वी मुंबई महानगर पालिकेने हातोडा मारला. अनधिकृत बांधकाम असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली. हा प्रकार बदला घेण्याच्या उद्देशाने घडल्याचे कंगनाने म्हटले आहे. आपली भूमिका मांडताना तिने मुख्यमंत्र्यांच्या नावाचा केलेला एकेरी उल्लेखामुळे वातावरण आणखी तापू शकतो. 

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत वादाच्या भोऱ्यात सापडली आहे. तिच्या ट्विटरवरील वक्तव्यानंतर महाराष्ट्रात तिच्या विरोधाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. प्रामुख्याने शिवसेनेने तिचा घेतलेला समाचार लक्षवेधी ठरला. शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगना रनौत यांच्यात ट्विटरवर चांगलेच वांदग पेटले. हिमाचल प्रदेशात बसून कंगनाने मुंबईवर अपशब्द वापरल्याने राग व्यक्त करण्यात आला. तिने मुंबईमध्ये राहू नये, अशा प्रतिक्रिया देखील उमटल्या. त्यानंतर कंगनाने मुंबईमध्ये येणार असल्याचे ट्विट करुन थेट शिवसेनेला चॅलेंज दिले होते.  

-शिवसेना समर्थकांची विरोधात घोषणाबाजी, रिपाईकडून कंगनाचे समर्थन

-कंगना मुंबईच्या विमानतळावर दाखल

- मुंबई दाखल होण्यापूर्वी कंगनाला धक्का, तिच्या अनाधिकृत कार्यालयावर मुंबई महापालिकेची कारवाई 

दिल्ली में 90 साल की महिला को एक 33 साल का युवक जबरदस्ती उठाकर ले गया और उनके साथ बेरहमी से मारपीट की और बार-बार रेप किया। अम्मा बार-बार युवक से गिड़गिड़ाती रहीं कि उनको छोड़ दे लेकिन उसने नहीं सुनी। FIR दर्ज हो गई है और उसे गिरफ्तार ​कर लिया है: दिल्ली महिला आयोग की अध्यक्ष

-मोहाली विमानतळावर सुरक्षा कवचात दिसली कंगना

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर मुंबई पोलिस आणि बिहार सरकार यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. कंगनाने ड्रग्जसंदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचे सांगत या वादात उडी घेतली. त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात अप्रत्यक्षरित्या संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कंगनाचा बोलवता धनी वेगळा आहे, अशा शब्दांत राज्यातील सत्ताधाऱ्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. एका बाजूला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कंगनाच्या मताशी सहमत नसल्याचे म्हटले असले. तरी सत्तेवर असलेल्या विरोधकांनी विरोधी बाकावर असताना मुंबई पोलिसांना कशी वागणूक दिली? असा प्रश्न त्यांनी उपस्थिती केल्याचेही पाहायला मिळाले आहे.  

केंद्र सरकारने कंगना रणावतला वाय श्रेणीतील सुरक्षा पुरवल्यानं राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतानाचे चित्र आहे. एकंदरीत ट्विटरवरील टिवटिवनंतर वातावरण तापले असताना वाय श्रेणीतील सुरक्षा कवचात अभिनेत्री कंगना राणावतत (Kangana Ranaut ) आज मुंबईच्या दिशेने येत आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्हास्थित आपल्या निवासस्थानावरुन ती मुंबईला येण्यासाठी निघली आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवेसेनेकडून तिला विरोधाचा सामना करावा लागू शकतो. 
-मुंबईला येण्यापूर्वी कंगनाने हिमाचल प्रदेशच्या हमीरपुर जिल्ह्यातील कोठी  परिसरात एका मंदिरात पूजा अर्चा केली. 
-
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com