Kanger Valley : कांगेर खोरे राष्ट्रीय उद्यान वारशाच्या संभाव्य यादीत
UNESCO Heritage : छत्तीसगडमधील प्रसिद्ध कांगेर खोरे राष्ट्रीय उद्यानाचा युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झाला आहे. हे स्थान जागतिक वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.
रायपूर : वैशिष्ट्यपूर्ण गुहांमुळे प्रसिद्ध असलेले छत्तीसगडमधील कांगेर खोरे राष्ट्रीय उद्यानाचा युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. जागतिक वारसा स्थळाच्या संभाव्य यादीत सामील होणारे कांगेर खोरे राज्यातील पहिले ठिकाण आहे.