
नवी दिल्लीः दिल्लीमधील मृत तरुणीला कारखाली १३ किलोमीटर फरफट नेल्याचं सांगितलं जात होतं. मात्र हा सीन रिक्रिएट केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत. मृत तरुणीला तब्बल ४० किलोमीटर कारखाली फरफटत नेल्याचं समोर येत आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला अगदी पहाटे दिल्लीमध्ये पुन्हा एक हादरवून सोडणारी घटना घडली. एका तरुणीला कारने कित्येक किलोमीटर फरफटत नेलं. कारमध्ये पाच जण होतं. ही कार वेगवेगळ्या चार पोलिस ठाण्यांसमोरुन गेली पण कुणालाही पत्ता लागला नाही. घटनेमध्ये पीडित तरुणीचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला आहे.
या सुलतानपुरी कंझावला घटनेचा नवीन व्हीडिओ समोल आलेला आहे. हा व्हीडिओ दिल्ली पोलिसांचा महत्त्वाचा पुरावा ठरु शकतो. या व्हीडिओमध्ये मृत अंजली आणि तिच्या मैत्रिणीमध्ये भांडण सुरु असल्याचं दिसून येतंय.
दोघींचं भांडण हॉटेलमध्ये सुरु होतं, परंतु इतरांनी तक्रार केल्याने त्यांना हॉटेल स्टाफने बाहेर काढलं. दोघी स्कुटीवर एकत्र गेल्या असल्या तरी गाडीवर बसण्यापूर्वी त्यांचं भांडण झाल्याचं दिसून येतंय.
हा व्हीडिओ १ जानेवारी रोजी पहाटे सव्वादोन वाजताचा आहे. कृष्ण विहार परिसरातून दोन्ही मुली स्कुटीवरुन जात असल्याचं दिसून येतंय. यानंतर थोड्याच वेळाने आरोपींच्या बलेनो कारने स्कुटीला धडक दिली. त्यानंतर व्हीडिओमध्ये कारमधून तरुणीची चप्पल पडत असल्याचंही दिसून येतंय.
मात्र या घटनेमध्ये पोलिसांनी सीन रिक्रिएट केल्यानंतर नवे पुरावे हाती आले आहेत. अंजलीला फक्त १३ किलोमीटर नव्हे तर ४० किलोमीटर कारखाली फरफटत नेल्याचं समोर आलेलं आहे.याप्रकरणी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षेची मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे.
पीडितेच्या मैत्रिणीने मोठा खुलासा
याप्रकरणी पीडितेची मैत्रिण निधीने माहिती दिली आहे. निधीने सांगितले की, कारने त्यांना समोरून धडक दिली. त्यानंतर मी घाबरले होते. म्हणून मी कोणाला काहीच सांगितले नाही. ती (पीडिता) गाडीखाली अडकली होती. गाडी तिला ओढत घेऊन गेली. माझ्या घरचे या प्रकरणात अडकू नयेत अशी माझी इच्छा होती, त्यामुळे काहीच बोलले नाही. आधी आम्ही हॉटेलच्या बाहेर भांडत होतो, ती म्हणत होती की मी स्कूटी चालवणार आणि मी म्हणत होते की मी चालवणार, कारण ती खूप दारू प्याली होती. त्यानंतर ती स्कूटी चालवत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.