

kanpur crime news
esakal
कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण उजेडात आलं आहे. गावात एक व्यक्ती आहे ज्याला लोक ‘नाक कटवा’ म्हणून ओळखू लागले आहेत. हा माणूस भांडण झालं की लोकांचे नाक किंवा बोट कापतो, अशी गंभीर आरोपांची मालिका आहे. गेल्या दोन वर्षांत ६ पेक्षा जास्त लोक त्याचा बळी ठरल्याचा दावा करण्यात येतो. अखेरीस त्रस्त गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.