
Kanpur Money Heist : कानपूरमध्ये फिल्मी स्टाईल चोरी; सुरंग खोदत लंपास केले कोटींचे सोने
तूम्ही अभिषेक बच्चनचा प्लेअर्स पिक्चर पाहिलाय का?. त्यामध्ये भारतातून चोरी गेलेले सोने अभिषेक स्वत: चोरतो. ते चोरण्यासाठी तो अनेक ठिकाणी सुरंग खोदतो, कॅनॉल फोडतो आणि शेवटी सोन्यापासून बनलेल्या कार घेऊन पसार होतो. अनेकांना हा पिक्चर तोंडपाठ झाला असेल. त्याच पिक्चरची कॉपी करत कानपूरमधील काही चोरट्यांनी एक कोटींचे सोने चोरले आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भानुती येथील शाखेत हा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी 10 फूट लांब आणि 4 फूट रुंद बोगदा खोदून हा प्लॅन यशस्वी केला आहे.
हेही वाचा: Coronavirus: ऑक्सिजन सिलेंडर्स, व्हेंटिलेटर्स तयार ठेवा; केंद्राकडून राज्यांना नवे निर्देश
चोरट्यांना संपूर्ण परिसर चांगलाच ठाऊक असल्याचा पोलिसांना संशय आहे. बँकेचे बांधकाम आणि वास्तू आणि तिजोरी क्षेत्राचा पोतही त्यांना माहीत होता. सकाळी बँकेत चोरी झाल्याचे बँक कर्मचाऱ्यांना समजले.
हेही वाचा: Eknath Shinde : खोक्यांच्या चौकशीसाठी तयार, आमची केवळ...; संदीपान भूमरेंनी राऊतांना सुनावलं
वरिष्ठ पोलिस अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. बँकेचे व्यवस्थापक नीरज राय यांनी दिलेल्या माहितीनूसार 29 जणांनी सोने गहाण ठेवून कर्ज घेतले होते.
पुढे ते म्हणाले की, चोरांनी बोगद्यातून बॅंकेत प्रवेश केला. त्यांनी लॉकर रूम उघडून सोने चोरले. पोलिसांनी सांगितले की, चोरट्यांनी कॅश बॉक्स देखील उघडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी झाला. कॅश बॉक्समध्ये 32 लाख रुपये होते.
चोरट्यांनी किती सोने चोरले हे शोधण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना अनेक तास चौकशी करावी लागली. पोलिस अधिकारी विजय धुळ यांनी सांगितले की, चोरट्यांनी 1.8 किलो सोने चोरले. त्याची किंमत 1 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
पोलीस अधिकारी विजय म्हणाले, 'हे बॅंकेत काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचेही काम असू शकते. गुन्हेगारांना बँकेत काम करणाऱ्या कुणाची तरी मदत मिळाली असावी. आमच्याकडे काही लीड्स आहेत. स्ट्राँग रूममधून बोटांचे ठसेही सापडले असून त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यात मदत होईल.