अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या; मृतदेह पेट्रोल ओतून जाळला I Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uttar Pradesh Crime News

कानपूरमध्ये एका तरुणाची विटेनं ठेचून हत्या करण्यात आलीय.

अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या; मृतदेह पेट्रोल ओतून जाळला

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) एका तरुणाची विटेनं ठेचून हत्या करण्यात आलीय. यानंतर ओळख लपवण्यासाठी मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून पेट्रोलनं जाळण्यात आलाय. दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नौबस्ता पोलीस स्टेशन (Naubasta Police Station) हद्दीतील यशोदनगर चौकातील आहे. या चौकात नेहमीच लोकांची वर्दळ असते. असं असतानाही रात्री साडेनऊ वाजता 25 ते 30 वर्षीय तरुणाची विटेनं ठेचून हत्या करण्यात आलीय. त्यानंतर मृतदेह पेट्रोल ओतून जाळण्यात आलाय. या घटनेची मिळताच, पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी जाऊन तपास केलाय. सध्या पोलीस मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

स्टेशन प्रभारी अमित भदाना, एसीपी विकास पांडे, एडीसीपी मनीष सोनकर आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त आनंद प्रकाश तिवारी हे देखील तपासासाठी घटनास्थळी पोहोचल्याचं सांगण्यात येतंय. फॉरेन्सिक टीमनं (Forensic Team) घटनास्थळावरून रक्तानं माखलेल्या विटांसह इतर पुरावेही गोळा केले आहेत. तरूणाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आनंद तिवारी यांनी सांगितलं. आरोपींनी मृताच्या चेहऱ्यावर विटेने वार केले आहेत. त्यामुळे त्याची ओळख पटवणं कठीण झालंय. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी सहाहून अधिक जणांना ताब्यात घेतलंय.

टॅग्स :Uttar Pradesh