

esakal
कारगिल, (पीटीआय) : लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या (एलएएचडीसी) निवडणुका हिवाळ्यात घेण्यास विरोध आणि नुकत्याच झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेचा फेरआढावा घेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी कारगिलमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमुळे दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती, तर रस्त्यांवरील वाहतूकही तुरळक होती. खबरदारीचा उपाय म्हणून विविध भागांत पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.