
Kargil War : कॅप्टन विक्रम बत्रांची जगातील सर्वात मोठी अंडर वॉटर प्रतिमा; पाहा Video
थिरुवअनंतरपुरम : कारगिल विजय दिवस नुकताच देशभरात साजरा करण्यात आला. यावेळी विविध प्रसंगांद्वारे कारगील युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या आठवणी जागा झाल्या. यामध्ये शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या एका खास प्रतिमेनं जगाचं लक्ष वेधून घेतलं. थिरुवअनंतरपुरम इथं कॅ. बत्रा यांची जगातील सर्वात मोठी अंडर वॉटर प्रतिमा साकारत त्यांना सलाम करण्यात आला. (Kargil Vijay Diwas World Largest Underwater Image of Captain Vikram Batra Watch video)
पोस्टर आर्टिस्ट दाविंची सुरेश यांनी शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांची पाण्यामध्ये १५०० स्केअर फूट लांबीची प्रतिमा साकारली आहे. भारतीय लष्करानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. स्कूबा डाव्हर्सच्या टीमच्या सहकार्यानं आणि बॉण्ड वॉटर स्पोर्ट्स प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून ही जगाचं लक्ष वेधून घेणारी गोष्ट साकारली गेली. २६ जुलै हा दिवस दरवर्षी कारगील विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या युद्धात भारतानं पाकिस्तानला धूळ चारली होती. या दिवशी कारगील युद्धात असामान्य शौर्य गाजवलेल्या जवानांचा सन्मान केला जातो.
जागतीक विक्रमाची नोंद
दरम्यान, शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचं जगातील सर्वात मोठं पाण्याखालील चित्र पांगोडे येथील मिलिटरी स्टेशन इथं साकारण्यात आलं आहे. ज्यानं युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरममध्ये नोंद केली. या कामगीरीबद्दल जागतीक विक्रम केल्याचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. पाण्याखाली हे चित्र साकारायला कलाकाराला तब्बल ८ तासांचा कालावधी लागला.
Web Title: Kargil Vijay Diwas World Largest Underwater Image Of Captain Vikram Batra Watch Video
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..