कर्नाटक : पोलिसांनी केला 201 किलो गांजा जप्त; आंध्रप्रदेशची टोळी जेरबंद

Ganja
Ganjasakal media

कर्नाटक : गांजा विक्री करणाऱ्या (201 kg ganja seized) आंध्रप्रदेशच्या चार तरुणांच्या पोलिसांनी मुसक्या (four culprit arrested) आवळल्यात. बंगळूरुत तब्बल २०१ किलोग्रॅम गांजा विकण्याचा टोळीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. बेकायदेशीरपणे गांजा विक्रीचा व्यवहार होत असल्याची खबर पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर कर्नाटकच्या पोलिसांनी (karnatak police) धडक कारवाई करत मालवाहतुकीच्या एका छोट्या वाहनाद्वारे आणण्यात आलेला २१० किलो गांजा जप्त करत केजी नगर मध्ये टोळीला अटक केली. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. (Karnatak police arrested four teenager in ganja selling crime and seized 201 kg ganja)

Ganja
नागालँडमधील हिंसक घटनेची चौकशी सुरू - लष्करप्रमुख नरवणे

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, पोलीस अधिकारी रक्षित एके यांच्या मार्गदर्शनाखाली गांजा विक्री करणाऱ्यांवर अटकेची करवाई करण्यात आलीय. एका वाहनातून गांजा विकण्यासाठी आणला जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तब्बल ६० लाख रुपये किमतीचा २०१ किलो गांजा जप्त केला. आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणमच्या जंगलातून आरोपींनी गांजा गोळा केला होता.

"गांजा खरेदी करण्यासाठी बंगळुरूच्या तस्करांनी आरोपींना अॅडवान्स पैसेही दिले होते. त्यानंतर या गांजावर कृत्रिमरित्या प्रक्रिया करुन तो पुन्हा आंध्रप्रदेशमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येणार होता. या गुन्ह्यात हात असणाऱ्या तस्कारांना अटक करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे." अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com