Assembly Election : निवडणुकीपूर्वी 'आप'ला मोठा झटका; केजरीवालांच्या 'या' बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

भास्कर राव यांनी आज 1 मार्च रोजी भाजपचं सदस्यत्व घेतलं.
Aap Leader Bhaskar Rao Joins BJP
Aap Leader Bhaskar Rao Joins BJPesakal
Summary

'आप'मध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याच्या नावाखाली पक्ष निधी गोळा केला जातो.

बेंगळुरू : कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (Karnataka Assembly Election) आम आदमी पक्षाला जोरदार झटका बसला आहे.

बेंगळुरूचे माजी पोलीस आयुक्त आणि आप नेते (Aam Aadmi Party) भास्कर राव (Bhaskar Rao) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भास्कर राव यांनी आज 1 मार्च रोजी भाजपचं सदस्यत्व घेतलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील (Nalin Kumar Kateel) यांनी त्यांचा पक्षात प्रवेश करुन घेतला. पत्रकारांना संबोधित करताना भास्कर राव यांनी 'आप'वर जोरदार निशाणा साधला.

Aap Leader Bhaskar Rao Joins BJP
Bihar Budget : 10 लाख तरुणांना रोजगार, महिलांनाही सरकारकडून मोठं गिफ्ट; वाचा अर्थसंकल्पातील 10 मोठ्या गोष्टी

भास्कर राव म्हणाले, 'आप'मध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याच्या नावाखाली पक्ष निधी गोळा केला जातो. 'आप'चा विकास आता होऊ शकत नाही. 'आप'च्या दोन मंत्र्यांचं तुरुंगात जाणं लज्जास्पद असल्याचं ते म्हणाले. सीबीआयनं काल अबकारी घोटाळ्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केलीये. त्याचबरोबर माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत.

Aap Leader Bhaskar Rao Joins BJP
Kejriwal Government : SC चा निकाल येताच केजरीवालांना मोठा धक्का; सिसोदिया, जैन यांचा मंत्रिपदाचा राजीनामा!

भास्कर राव पुढं म्हणाले, मी पीएम मोदींपासून खूप प्रेरित आहे. पंतप्रधानांची कामं पाहून मी भाजपमध्ये प्रवेश केला. मला वाटतं की, मी भाजपमध्ये अधिक योगदान देऊ शकतो. पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीनं मला पक्षात येण्याची प्रेरणा दिली. भास्कर राव 11 महिन्यांपूर्वी गेल्या वर्षी 4 एप्रिलला 'आप'मध्ये सामील झाले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भास्कर राव यांना पक्षाचं सदस्यत्व दिलं होतं. भास्कर राव यांनी पक्ष सोडणं हा 'आप'साठी मोठा धक्का मानला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com