Bagalkot Shivaji Jayanti Violence
esakal
बंगळूर : बागलकोट शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने तणावपूर्ण (Bagalkot Shivaji Jayanti Procession Turns Violent) परिस्थिती निर्माण झाली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने जमावबंदी लागू केली असून, पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.