कर्नाटकात बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येनंतर काय काय घडलं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नाटकात बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येनंतर काय काय घडलं?

कर्नाटकात बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येनंतर काय काय घडलं?

शिंपी म्हणून काम करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या युवा शाखा बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षा (२६) याची अज्ञात व्यक्तींनी खून (Murder) केल्याची घटना घडलीये. त्याच्या हत्येनंतर राज्यभर तणावाचं वातावरण असून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत. कर्नाटकातील शिवमोग्गा येथे तणावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदीही घातली आहे. याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

त्याच्या हत्येनंतर कलम 144 लागू करण्यात आलं मात्र, या घटनेचे पडसाद राज्यात काही ठिकाणी उमटले आहेत. काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ तर काही ठिकाणी दगडफेकीची घटना घडली आहे. 23 वर्षीय कार्यकर्त्याच्या हत्येनंतर विरोधाचं रुपांतरण हिंसेत झालेलं पहायला मिळालं. मात्र, परिस्थिती अधिक चिघळून हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी अश्रूधुराचाही वापर केला.

याबाबत बोलताना गृहमंत्री अरगा जननेंद्र यांनी म्हटलंय की, आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. येते दोन-तीन दिवस काळजी घेण्याची गरज आहे. सध्यातरी, शिवामोग्गामधील परिस्थिती ताब्यामध्ये आहे. 200 अधिक पोलिस कर्मचारी बेंगुलुरुमधून पाठवण्यात आलं आहे. 1200 आधीपासूनच तिथे आहेत. RAF सुद्धा तिथे आहेत. परिस्थितीवर बारीक लक्षणे ठेवण्याबाबत आम्ही SP ना सूचना दिल्या आहेत, असंही गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. आम्ही ३ जणांना अटक केली आहे. माझ्या माहितीनुसार, या हत्येमध्ये 5 लोकांचा सहभाग आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Karnatakamurder