बंगळूर : राज्यात कोविड-१९ ची (COVID-19) चिंता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. आजच्या अहवालानुसार, राज्यात पाच नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे आणि पहिल्यांदाच, बंगळूरमध्ये कोरोनामुळे एक मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. श्वसनाच्या समस्या आणि इतर समस्यांसाठी एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने (Health Department) या मृत्यूबाबत संपूर्ण अहवाल मागवला आहे.