Bhagyalakshmi Scheme
esakal
बेळगाव : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींसाठी वर्ष २००६ पासून ‘भाग्यलक्ष्मी’ योजना (Bhagyalakshmi Scheme) सुरू करण्यात आली आहे. वर्ष २००६ मध्ये योजनेसाठी अर्ज केलेल्या पालकांच्या मुलींचे वय २०२५ मध्ये १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे भाग्यलक्ष्मी बाँडची मुदत (म्यॅचुरिटी) पूर्ण झालेल्या कुटुंबीयांकडून विविध कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र, सुमारे सात महिने उलटले तरी अद्याप योजनेची रक्कम खात्यात जमा करण्यात आली नाही. यामुळे पालक वर्गासह लाभार्थ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.