Karnataka Rain Alert : पुढील 72 तास धोक्याचे! राज्यात शुक्रवार, शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा; 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट
Karnataka Rain Alert : पुढील ७२ तासांत कर्नाटकात (Karnataka Rain) मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान खात्याने १४ जूनपर्यंत कर्नाटकच्या किनारी भागांसह १३ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर केला आहे.
बंगळूर : बंगळूरमध्ये पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे. गुरुवारी संध्याकाळी अचानक झालेल्या पावसामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. हवामान खात्याने (IMD) पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.