Basavaraj Bommai : अकाऊंट फेक की मुख्यमंत्री? 'ते' वादग्रस्त ट्विट अजूनही कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Basavaraj Bommai twitter account

Basavaraj Bommai : अकाऊंट फेक की मुख्यमंत्री? 'ते' वादग्रस्त ट्विट अजूनही कायम

मुंबईः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातल्या काही गावांवर दावा केल्यानंतर उभय राज्यांमध्ये राजकारण तापलं आहे. आता जेव्हा हे प्रकरण भाजपच्या अंगाशी येत असल्याचं दिसून येतंय, तेव्हा मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरुय. 'तो मी नव्हेच' अशी लखोबा लोखंडेची भूमिका बोम्मई यांनी घेतली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी काल दोन्हीकडील मुख्यमंत्री, गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला गेले होते. त्यांच्यामध्ये साधारण वीस मिनिटे बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या चर्चेची आणि निर्णयांची माहिती स्वतः गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. दोन्ही राज्यातील तीन-तीन मंत्र्यांची समिती यावर तोडगा काढेल, असं अमित शाह म्हणाले.

दोन्ही संघर्षात फेक ट्विट केले गेले असंही समोर आलं असून अशा प्रकारचे फेक ट्विट्स जिथं समोर आले आहेत तिथं गुन्हा दाखल केला जाईल. तसेच ज्यांनी हे केलं आहे त्यांना जनतेसमोर एक्पोज केलं जाईल, असंही शहा यावेळी म्हणाले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं ते ब्लू टिक असलेलं अकाऊंट फेक कसं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बरं त्या अकाऊंटवरुन मुख्यमंत्री बोम्मई यांच्या कार्यक्रमांचेही ट्विटही करण्यात आलेले आहेत. इतक्या दिवस हे अकाऊंट फेक असल्याचं कुणाच्याच निर्दशनास कसं आलं नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नेमकं खोटं कोण, मुख्यमंत्री बोम्मई की ट्विटर अकाऊंट? त्यात कहर म्हणजे याच अकाऊंटवरुन ९ डिसेंबर रोजी जत तालुक्यातील गावांसदर्भात ट्विट करण्यात आलेलं होतं. ते ट्विट आजही कायम आहे.