कुमारस्वामींची साडेसाती आज संपणार! म्हणूनच टाळला बहुमताचा ठराव?

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जुलै 2019

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या ज्योतिषाने सांगितलेल्या सल्ल्यानुसार हा विश्वासदर्शक ठराव आजपर्यंत (23 जुलै) लांबविण्यात आला आहे. आज दुपारी बारानंतर कुमारस्वामी यांच्यामागील साडेसाती संपणार आहे. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आनंद येईल, असे भाकीत त्यांच्या ज्योतिषाने वर्तविले होते.

बंगळूर : कर्नाटकमधील सत्ता नाट्य आज (मंगळवार) संपुष्टात येण्याची चिन्हे असली तरी, गेल्या सोमवारपासून सुरु असलेले हे सत्तेचे नाट्य आजपर्यंत का लांबविण्यात आले याचा खुलासा झाला आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या ज्योतिषाने सांगितलेल्या सल्ल्यानुसार हा विश्वासदर्शक ठराव आजपर्यंत (23 जुलै) लांबविण्यात आला आहे. आज दुपारी बारानंतर कुमारस्वामी यांच्यामागील साडेसाती संपणार आहे. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आनंद येईल, असे भाकीत त्यांच्या ज्योतिषाने वर्तविले होते. त्यामुळेच आजपर्यंत हे सत्ता नाट्य लांबविण्यात आल्याची चर्चा आहे. गेल्या आठवड्यात कुमारस्वामींच्या ज्योतिषाने त्यांना हा सल्ला दिला होता. 

सोमवारी कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी कामकाज स्थगित करताना आज सायंकाळी सहापर्यंत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यास सांगितले आहे. काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी अखेरीस अध्यक्षांना विनंती करून चारपर्यंत सर्व चर्चा संपवून पाच वाजता आमचे मुख्यमंत्री कुमारस्वामी सभागृहाला उद्देशून बोलतील. त्यानंतर सहा वाजता मतदान घेण्याची विनंती केली. त्याला विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. मात्र, अध्यक्षांनी सहापर्यंत मतदान होणार असे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka CM Kumarswamy astrologer told him a week ago that he should extend the trust vote