Karnataka CM Siddaramaiah : ‘’सरकार अविश्वास प्रस्तावाला तोंड देण्यास तयार'’ ; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचं मोठं विधान!

Siddaramaiah government ready to face the no-confidence motion : नेतृत्वाच्या मुद्द्यावर हायकमांडच्या निर्णयाचे पालन केले जाईल, असंही म्हणाले आहेत.
CM Siddaramaiah

CM Siddaramaiah

esakal

Updated on

Karnataka CM Siddaramaiah update : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधिमंडळ अधिवेशनाआधी मोठं विधान केलंय.  ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणल्यास त्यांचे काँग्रेस सरकार कोणत्याही अविश्वास प्रस्तावाला तोंड देण्यास तयार आहे.

 याचबरोबर त्यांनी हेही सांगितले की, ते आणि शिवकुमार दोघेही नेतृत्वाच्या मुद्द्यावर हायकमांडच्या निर्णयाचे पालन करतील. विशेष म्हणजे यावेळी  त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार देखील उपस्थित होते. 

मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, "विरोधीपक्ष अविश्वास प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव किंवा इतर कोणताही प्रस्ताव आणत असले तरी, आम्ही त्याला तोंड देण्यास तयार आहोत. आमचे सरकार हे उघड्या पुस्तकासारखे आहे, पारदर्शक आहे. आम्ही कोणत्याही गोष्टीला तोंड देण्यास तयार आहोत."

CM Siddaramaiah
Bank Holiday : पुढील आठवड्यात कधी असणार बँकांना सुट्टी? ; जाणून घ्या, महत्त्वाची माहिती अन्यथा खोळंबतील कामे

तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी स्पष्ट केले की, पक्षाने जेडीएससोबत युती करून सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यावर अद्याप चर्चा केलेली नाही किंवा निर्णय घेतलेला नाही. कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून सुरू होईल आणि या महिन्याच्या १९ तारखेपर्यंत चालेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com