

बंगळूर: कर्नाटक काँग्रेसमधील सत्तावाटपाचा वाद शिगेला पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज एकत्र येत ‘नाश्ता-डिप्लोमसी’ करून ऐक्याचा संदेश दिला. काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार, मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना सकाळी ‘कावेरी’ येथील अधिकृत निवासस्थानी नाश्त्यासाठी आमंत्रित केले होते. शिवकुमार सकाळी ९.३० वाजता ‘कावेरी’ येथे पोहोचले. सिद्धरामय्या यांनी त्यांचे स्वागत करत बैठक खोलीत नेले.