Karnataka Political Crisis
esakal
नवी दिल्ली : कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून (Karnataka Political Crisis) सुरू असलेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची घडामोड घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये नाश्त्याच्या निमित्ताने चाललेली ही चर्चा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.