Karnataka Political News
esakal
बंगळूर (कर्नाटक) : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांनी राज्यात नेतृत्वात कोणताही बदल होणार (Karnataka Congress) नसल्याचे विधान केल्यानंतर, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे कट्टर समर्थक आणि काँग्रेस आमदार एच. ए. इक्बाल हुसेन यांनी आमचे ध्येय शिवकुमार (DK Shivakumar) यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आहे. सहा जानेवारीला ते मुख्यमंत्री होतील, असे शनिवारी स्फोटक विधान केले. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.