
बेंगळूरु: कर्नाटकच्या मंगळुरुजवळील प्रसिद्ध धर्मस्थळ मंदिर परिसरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार, हत्या आणि त्यांना दफन केल्याच्या दाव्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. धर्मस्थळात काम केलेल्या एका सफाई कर्मचाऱ्याने दावा केला की, त्याला १९९८ ते २०१४ दरम्यान महिला आणि अल्पवयीन मुलींचे मृतदेह दफन करण्यास भाग पाडले गेले होते, त्यानंतर हे प्रकरण समोर आले.