Crypto Investment Scam
esakal
बंगळूर : कर्नाटकातील क्रिप्टो करन्सी गुंतवणूक फसवणूक प्रकरणात (Crypto Investment Fraud) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १८ डिसेंबर रोजी मोठी कारवाई करत कर्नाटक, महाराष्ट्र आणि नवी दिल्लीतील एकूण २१ ठिकाणी एकाच वेळी झडतीसत्र राबवले. चौथ्या ब्लॉक कन्सल्टंट्स आणि इतर आरोपींविरुद्ध दाखल प्रकरणाच्या अनुषंगाने, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए)-२००२ अंतर्गत ही कारवाई केली. त्याची माहिती ईडीने सोमवारी (ता. २२) दिली.