"मी असे कधीही म्हटले नाही. भाजपने माझे विधान विकृत केले आहे. मी गेल्या ३६ वर्षांपासून आमदार म्हणून विधानसभेत आहे. माझ्याकडेही सामान्य ज्ञान आहे."
बंगळूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी सोमवारी राज्यातील मुस्लिमांसाठी (Muslim Reservation) चार टक्के आरक्षण देण्यासाठी संविधानात (Constitution) दुरुस्ती करू, असे वक्तव्य केल्याचा आरोप करून भाजपने जोरदार टीका केली आहे; परंतु आपण अशी कोणतीही टिपण्णी केली नसल्याचे सांगून आपल्या बोलण्याचा विपर्यास केल्याचे स्पष्टीकरण शिवकुमार यांनी दिले आहे.