Karnataka farmer relief amount 2500 rupees
esakal
बंगळूर : कर्नाटक राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त २,५०० रुपयांची तात्पुरती मदत देण्याचा अधिकृत आदेश जारी केला (Karnataka farmer relief amount 2500 rupees) आहे. या मदतीच्या वितरणात गैरव्यवहार टाळून योग्य लाभार्थ्यांपर्यंत रक्कम पोहोचावी, यासाठी ई-प्रशासन आणि भूमी कक्षामार्फत १७ अटी लागू केल्या आहेत.