राज्यपालांचा होकार मिळताच राज्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांचा त्रास संपणार आहे. याद्वारे हा अध्यादेश मायक्रो फायनान्स कर्जामुळे त्रस्त असलेल्या आणि मृत्यूला कवटाळणाऱ्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे.
बंगळूर : राज्यात व्याज आणि थकबाकी वसुलीच्या नावाखाली पिळवणूक करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर (Microfinance Companies) नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारने (Karnataka Government) अध्यादेश काढला आहे. हा अध्यादेश सूक्ष्म वित्त कर्जाने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे.