

कर्नाटक सरकारने प्रमुख तेल विपणन कंपन्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले असून, पुरवठा केल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण ठरवून दिलेल्या कमाल मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचा दावा केला आहे.
प्रयोगशाळेतील तपासणीत पेट्रोलमधील इथेनॉलचे हे प्रमाण तब्बल ३१.२ टक्क्यांपर्यंत आढळल्याने राज्य सरकारने नियमबाह्य व अतिरिक्त इथेनॉलमिश्रित इंधन विकणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय.