बंगळूर : बेळगावसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात कन्नडची सक्ती (Kannada Compulsion) करून मराठीची गळचेपी करणाऱ्या कर्नाटक सरकारने मंगळूर (दक्षिण कन्नड) जिल्ह्यात कन्नडची सक्ती करणारे परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे तुळू भाषिक दुखावले असून, दक्षिण कन्नड आणि उडुपी भागात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.