
कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी एका अनोख्या आणि विनोदी प्रकरणाचा निकाल दिला. ‘डेझी’ नावाच्या मांजराला चोरल्याच्या आरोपाखाली तहा हुसेन नावाच्या व्यक्तीविरुद्ध दाखल झालेला खटला कोर्टाने ‘फालतू’ ठरवत रद्द केला. या प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधले असून, न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी सुनावणीदरम्यान मजेशीर टिप्पणी केली, “डेझी नावाच्या मांजराने सर्वांना वेड लावलं आहे!”