Karnataka Politics : निवडणुकीआधीच राजकारण तापलं! 'या' नेत्याची आमदारकी धोक्यात; न्यायालयानं ठरवलं 'अपात्र' | Latest Marathi News | Breaking Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

D C Gowrishankar Karnataka High Court

गौरीशंकर यांच्यासमोर 30 दिवसांत सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचा पर्याय आहे.

Karnataka Politics : निवडणुकीआधीच राजकारण तापलं! 'या' नेत्याची आमदारकी धोक्यात; न्यायालयानं ठरवलं 'अपात्र'

Karnataka Politics : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) खंडपीठानं तुमकूर ग्रामीण मतदारसंघाचे धजदचे (JDS) आमदार डी. सी. गौरीशंकर (D. C. Gowrishankar) यांचं आमदारपद अपात्र ठरवलं. मात्र, गौरीशंकर यांच्या वकिलांनी या आदेशाला एक महिना स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाला केली. (Latest Marathi News)

त्यामुळं न्यायालयानं एक महिन्याची स्थगिती दिली. दरम्यान, गौरीशंकर यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाद मागून उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाबाबत स्थगिती मिळविली तरच आमदारपद सुरक्षित राहील, अन्यथा ते अपात्र ठरतील, असं न्यायालयानं सांगितलंय.

भाजपचे (BJP) पराभूत उमेदवार बी. सुरेश गौडा यांनी गौरीशंकर यांची उमेदवारी अवैध ठरवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. सुरेश गौडा यांच्या बाजूनं ज्येष्ठ वकील नलीन मयेगौडा यांनी प्रदीर्घ युक्तिवाद केला. निकाल येताच गौरीशंकर यांचे वकील आर. हेमंत राज यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकालाला स्थगिती देण्याची याचिका दाखल केली.

आता खंडपीठानं याचिकेला परवानगी देत ​​30 दिवसांसाठी आदेशाला स्थगिती दिलीये. ही निवडणूक उच्च न्यायालयानं रद्द केल्यामुळं गौरीशंकर यांना लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवलं जाऊ शकतं. त्यामुळं गौरीशंकर यांच्यासमोर 30 दिवसांत सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचा पर्याय आहे.